सोयाबीन बीजप्रक्रिया माहिती? बीजप्रक्रिया म्हणजे काय
सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी? बीजप्रक्रिया म्हणजे काय? नमस्कार, मराठी शेतकरी मित्रानो आज आपण सोयाबीन पिकांची बीजप्रक्रिया कशी करावी व बीजप्रक्रिया म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ। सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्र मध्ये घेतले जाणारे मुख्य नगदी पीक आहे हे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते। अत्यंत कमी खर्चात आणि जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून याची ओळख आहे। आज च्या या स्पर्धेच्या युगात शेतीमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे ती म्हणजे उत्पन्न वाढीची। आपण नेहमी बघतो की शेतकऱ्यांना फार कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो अशात पीक वाढी साठी आज आधुनिक शेती च्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे। तर बघूया काय आहे ही बीजप्रक्रिया? बीजप्रक्रिया म्हणजे पेरणीच्या आधी बियाण्यावर केलेली रासायनिक प्रक्रिया ज्यानेकरून पिकाला भविष्यात होणाऱ्या रोगांपासून सामना करण्यासाठी दिलेली ताकत। आपण बघतो बऱ्याच वेळा पेरणी केल्या नंतर आपणास दुबार पेरणी करण्याची गरज पडते त्याचे एक मूळ कारण म्हणजे बरेच शेतकरी आपल्या शेतात विना बीजप्रक्रिया करता पे...