आधुनिक शेती शाळा म्हणजे काय? आणि शेती शाळेचे फायदे?
आधुनिक शेती शाळा कशाला म्हणतात? आणि ती कश्या प्रकारे चालवली जाते?
आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या शाळा बघाल्या आपण पण यामध्ये जावुन शिकलो पण ही शेती शाळा म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे हे आज थोडक्यात बघू।
आधुनिक शेती शाळा ही शेतकऱ्यांसाठी काढलेली नव्या पद्धतीची शाळा आहे ज्या मध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यात येते। आज सर्व व्यवसायातील लोक भरपूर पैसे कमावतात त्यांचे गाडी बंगले आहेत पण जगाचा पोशिंदा आजपण जिथल्या तिथं आहे। या शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल या विचाराने शेतीमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक संगठना यांनी गावागावात, खेड्यात ही शेती शाळा सुरु केली।
या शेती शाळेमध्ये प्रत्येक हंगामात अगदी सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं ते पण मोफत या शेती शाळेत सुरुवातीला मातीपरिक्षन पासून बीजप्रक्रिया त्यानंतर पेरणी खते फवारण्या, व काढणी पर्यंत सर्व कामामध्ये मार्गदर्शन केले जाते ते यासाठी की याचाच उपयोग करून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे।
या आधुनिक शेती शाळेचे फायदे कमी शिकणाऱ्या शेतकरी वर्गासाठी जणू वरदान ठरले आहे कारण समजदार आणि शिकलेला शेतकरी माहिती घेऊ शकतो पण जो जुना मजूर वर्ग आहे तो आज सुद्धा जुन्या पध्दतीने शेती करतो म्हणून त्याचे उत्पन्न वाढत नाही पण या आधुनिक शेती शाळेच्या माध्यमातून आज तळा गळातील शेतकऱ्यांना मदत मिळत आहे हे या आधुनिक शेती शाळेचे फायदे ठरत आहे।
या आधुनिक शेती शाळेत कापूस सोयाबीन अश्या अनेक हंगामी पिकावर सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत काम केले जाते व त्या मुळे बऱ्याच गरीब व कमी शिकलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे।
आपण आधुनिक शेती शाळा हे थोडक्यात का होईना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला लेख आवडला असेल तर कंमेंट मध्ये जरूर कळवा।
या आधुनिक शेती शाळेविषयी you tube वर बरेच कार्यक्रम चालू आहेत कृपया शेतकरी बांधवांनी ते कार्यक्रम जॉईन करून अधिक माहिती घ्यावी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा