उद्योग महाराष्ट्राचे? नव्या तरुणांसाठी कुठे आणि कशा प्रकारच्या संधी असू शकतात?

 उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग व नवे उद्योग कोणते?

अ) नवे उद्योग

1) कुकुटपालन

2)मत्स्यव्यवसाय

3)शेळीपालन

4)digital marketing

5) आधुनिक शेती......

अजून बरेच........

नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणाने उद्योग करण्या आधी कुठल्या गोष्टीवर भर द्यायला हवं


"बरेच मित्र सरकारच्या धोरणांना कंटाळून शेवटी काही तरी उद्योग करू या आशेने उद्योग करण्यास प्रयत्न सुरू करतात, काही जण सुरवातीला प्रयत्न करतात पण सर्वांपेक्षा कोण चांगला उद्योजक ठरतो? 

उद्योग क्षेत्रात करिअर करायचंय तर आपणास स्वतः मधील काय क्षमता आहे हे ओळखणं गरजेचे आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर काय आपण एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो उदा. एखाद्या खेड्याविभागातील मुलगा लहानपणापासून गाय, म्हशी, शेती, अश्या वातावरणात वाढलेला असतो त्याला बऱ्याच प्रमाणात याची माहिती असते आता जर त्याच मुलानं आवड असेल व शेळीपालन व्यवसाय करायचा म्हटलं तर तो यामध्ये खूप समोर जाईल याचे कारण त्याला सुरुवातीपासून या मध्ये आवड तर होतीच पण माहिती होती व आज अजून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तो या व्यवसायात खूप काही करू शकतो।

तसेच जे नवीन कोणी पण कुठल्याही व्यवसाय सुरु करण्या आधी त्याविषयी सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे बरेच जण काय करतात उतावळेपणा मध्ये व्यवसाय सुरू करतात खूप पैसे लावतात व 2 ते 3 महिन्यात सर्व गुंडाळून बसतात व इतरांना सला देतात की व्यवसाय करू नका नुकसान होत आता अशा लोकांनी त्या व्यवसायाचे अपुरे ज्ञान घेतले असते व उगाच तो करायला म्हणून मी करतो या भावनेमुळे स्वतः चे नुकसान करून घेतो म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्या आधी स्वतः ची क्षमता बघा चांगल्या अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊन बघा आणि मगच व्यवसाय सुरू करा

आजच्या काळात व्यवसाय अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही विचार करून व योग्य मार्गदर्शन घेऊन केली तर खूप समोर जाल व्यवसाय सुरु करण्यात सुरुवातीला काही अडचणी निर्माण होतात पण म्हणतात ना "जो अडचणीशी सामना करतो त्याला कुठंच मरण नाही"

आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय लोकांच्या म्हणण्यावर करू नका कारण तो करायचा तुम्हाला आहे तुमची त्यामध्ये आवड असेल तर तो व्यवसाय तुम्ही खूप समोर न्याल आणि दुसऱ्याच अनुकरण करून जर तोच व्यवसाय करायचा म्हणत असाल तर संपून जाल म्हणुन स्वतः शोध घ्या अभ्यास करा व जिद्दीने लागा कामाला कारण

"आपले भविष्य आपल्या हातात आहे"


लेख जर आवडला असेल तर comment मध्ये प्रतिक्रिया द्या व आपल्या मराठी भावाला support करा पुढील ब्लॉग मध्ये व्यवसायातील अडथळे दूर कसे करायचे ते बघू



टिप्पण्या