गरीब कोण आहे? आज श्रीमंत आणि गरीब यात काय फरक आहे?


 #श्रीमंत कोण याचा निवाडा करा ... 

👇👇👇👇

 अरबपती सकाळी महालात संगमरवरी डायनिंग टेबल वर बसला होता. समोर चांदीच्या थाळीत बिनमिठाची, बिन तिखटाची, बिना मसाल्याची भेंडीचीच भाजी होता आणि बिनतेलाची चपाती होती, थंडगार फ्रिजचे बिसलरी पाणी होते.

सात हजार कोटिंचे घर होते, दहा नोकर होते, नाष्टा वाढत होते, छताला पंखे फिरत होते.

इमारती खालुन प्रदुषणाचे धूराडे धूर ओकत होते.

अशात अरबपती नाष्टा करत होता.

🌱💧🌱💧🌱💧🌱💧

   इकडे शेतात दुर बांधावर शेत मजुर बसला होता ,त्यांनेही  शिदोरी सोडली होती ,त्यात तेल लावलेली चपाती होती, भेंडीचीच भाजी होती, कांदा होता, ठेसा होता, मीठ होते, तोंडी लावायला लुसलुशीत मेथीची भाजी होती, प्यायला मटक्यांतले थंडगार पाणी होते. समोर हिरवे गार शेत होते, 

पिके वा-यांवर डोलत होते, थंडगार वारा होता, पक्ष्यांचा किलबिलाट होता,  तो आरामात न्याहरी करत होता.

   #अरबपती_जे_खात_होता_तेच_शेत_मजूर_खात_होता.

      आता सांगा.... 

दोघांत काय फरक होता.

अरबपती पन्नास वर्षाचा होता आणि मजूरही पन्नास वर्षाचाच होता.नाष्ट्या नंतर अरबपती ने बीपीची मधुमेहाची गोळी खात होता. आणि शेतमजुर चुनालावून पान खात होता.

🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳

    कमी कुणीच नाही मोठा कुणीच नाही.

वेळीच सावध व्हा सकस अन्न खा ! 

शुद्ध हवे साठि झाडे लावा.🌱

जिवनशैलीत बदल करा.🌳

विचार करा .....करायलाच पाहिजे..... 

   🌱 #निसर्गवाणी💧🌳

टिप्पण्या