सोयाबीन बीजप्रक्रिया माहिती? बीजप्रक्रिया म्हणजे काय

 सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी? बीजप्रक्रिया म्हणजे काय?

नमस्कार, 

            मराठी शेतकरी मित्रानो आज आपण सोयाबीन पिकांची बीजप्रक्रिया कशी करावी व बीजप्रक्रिया म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ।

सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्र मध्ये घेतले जाणारे मुख्य नगदी पीक आहे हे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते। अत्यंत कमी खर्चात आणि जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून याची ओळख आहे। आज च्या या स्पर्धेच्या युगात शेतीमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे ती म्हणजे उत्पन्न वाढीची। आपण नेहमी बघतो की शेतकऱ्यांना फार कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो अशात पीक वाढी साठी आज आधुनिक  शेती च्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे। 

तर बघूया काय आहे ही बीजप्रक्रिया?

बीजप्रक्रिया म्हणजे पेरणीच्या आधी बियाण्यावर केलेली रासायनिक प्रक्रिया ज्यानेकरून पिकाला भविष्यात होणाऱ्या रोगांपासून सामना करण्यासाठी दिलेली ताकत।

आपण बघतो बऱ्याच वेळा पेरणी केल्या नंतर आपणास दुबार पेरणी करण्याची गरज पडते त्याचे एक मूळ कारण म्हणजे बरेच शेतकरी आपल्या शेतात विना बीजप्रक्रिया करता पेरणी करतात त्याच्या मुळे पिकाची उगवण क्षमता कमी होते। व बियाणे उगवण्या आधी त्याला बुरशी जन्य रोगामुळे बी खराब होते। पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या नुकसानास टाळता येत ती म्हणजे बीजप्रक्रिया करून।

सोयाबीन बीजप्रक्रिया पद्धत?

साधारणतः जर आपण बैलजोडी ने पेरणी केली तर आपणास एकरी 30 किलो बियाणे लागते। पण तेच जर आपण पी,बी, एफ किंवा ट्रॅक्टर च्या साहाय्याने पेरणी केली तर आपणास 23 ते 25 किलो एकरी बियाणे लागते या एकरी 23 किलो मागे 60ml बुरशीनाशक (payrothan) किंवा कृषी सल्लागार यांच्या मदतीने घेऊन एका छोट्या शेती साठी वापरात असलेल्या जग किंवा डब्यात थोडं पाणी घ्या त्यात ते रसायन मिसळून स्प्रे जो की आपण कटिंग च्या दुकानात बघतो त्यात भरा।

तुमच्या सोयाबीनचे बियाणे एक गोण्या वर मोकळे करून स्प्रे नि ते मिश्रण सम प्रमाणात त्यावर शिंपडा। पण लक्षात असू द्या बीजप्रक्रिया करत असताना तोंडाला मास्क आणि हातामध्ये गोल्ज असणे आवश्यक आहे कारण हे रसायन विषारी असल्याने तुम्हाला इजा होऊ शकते।

शिंपडणे झाल्यावर गोण्याला थोडे हलवून ते बियाणे खाली वर करा। एक लक्षात असू द्या की हाताने ही प्रक्रिया करणे टाळा कारण बियांचे टरफल निघून उगवण क्षमता कमी होते। ते सर्व झाल्यावर या बियाण्याला सावली मध्ये 15 ते 20 मिनिटे सुकवा त्या नंतर हे बियाणे पेरणी साठी तुम्ही वापरू शकता।

बीजप्रक्रिया ही कुठल्याही प्रकारच्या शेती साठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया मानली जाते कारण या प्रथम प्रक्रियेत आपणास पुढील पिकाच्या उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते।

बीजप्रक्रिया विषयी अजून माहिती तुम्ही social media वरून गोळा करू शकता जसे कुठल्या प्रकारचे रसायन वापरावे त्याचे प्रमाण किती असावे।

जर तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर नकीच प्रकिया द्या। आणि शेती विषयी अजून माहिती येणाऱ्या ब्लॉग मधून आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन 

                          धन्यवाद

आपलाच सहकारी मित्र: गौरव दत्तराव गोभे👍



टिप्पण्या